मुंबई : लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा सध्या सुरू आहेत. एप्रिलचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सगळ्यात आता लाडक्या बहिणींना पाच हजार रुपये दिले तरी आमचे काही म्हणणे नाही. मात्र, आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर महिलांना पैसे वाढवून देऊ, असे वक्तव्य मंत्री नरहरी झिरवळ यांनी केले आहे. लाडक्या बहिणींना एक हजार ५०० रुपयांऐवजी आता दोन हजार १०० हे रुपये देण्यात येईल, असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीवेळी दिले होते. त्यावर बोलताना झिरवळ म्हणाले, पाच हजार रुपये दिले तरीही आमचे काही म्हणणे आहे. पाणीसारख्या मुद्द्यावर काम करण्यास पैसे नाहीत. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर महिलांना पैसे वाढवून देऊ.
Fans
Followers